रोहित कणसे
आपल्यापैकी बरेच जण नियमीत मद्यापान करत असतील पण त्यांना कायम शंका असते की दारू शाकाहारी आहे की मांसाहारी?
मद्यपान करणे नेमके शाकाहारी आहे की मांसाहारी याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
मद्य हे विवीध प्रकारचे धान्य, फळे किंवा भाज्या अंबवून तयार केली जाते, या प्रक्रियेमध्ये यीस्ट वापरून पदार्थांमधील साखरेचे अल्कोहोल बनवले जाते.
बीयर, वाईन किंवा बहुतेक स्पिरिट्स जसेकी वोडका, जिन किंवा रम तयार करण्यासाठी धान्य, फळे किंवा भाज्यांचा वापर केला जातो त्यामुळे ही दारू शाकाहारी मानली जाते.
पण काही वाइन बनविण्याच्या प्रक्रियेत क्लेअरीफिकेशन प्रक्रियेत, अंड्याचा पांढरा भाग, इसिंग्लास (Isinglass) किंवा इतर प्राण्यांपासून तयार केलेले पदार्थ वाइन साफ करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
तसेच काही विशेष प्रकारच्या दारूच्या निर्मीतीत जनावरांशी संबंधीत काही पदार्थांचा वार केला जाऊ शकतो. जसे की काही वाईन्समध्ये चरबी वापरली जाते.
जर तुम्ही शाकाहारी असाल तर दारू विकत घेतना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
दारूची बॉटल विकत घेतेवेळे लेबल व्यवस्थित वाचून घ्या, अनेक कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट शाकाहारी असल्याचा स्पष्ट उल्लेख करतात.
जर तुम्हाला एखाद्या दारूच्या ब्रँडबद्दल शंका अशेल तर कंपनीशी संपर्क करून माहिती घ्या.
हमखास यश मिळवून देणाऱ्या 9 करिअर टिप्स