कोण आहे अल्लू अर्जुनची बायको? कमाईमध्ये 'पुष्पा'ला टक्कर

सकाळ वृत्तसेवा

अल्लू अर्जुन

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे. चित्रपटाच्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये महिलेचा मृत्यू झाला होता.

काँग्रेस सरकार

महिलेच्या मृत्यूला थेट अल्लू अर्जुन जबाबदार नसताना त्याला अटक केल्याने विरोधकांनी काँग्रेस सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

स्नेहा रेड्डी

अटकेवेळी अल्लू अर्जुन आपल्या पत्नीला समजावताना दिसत आहेत. अल्लूच्या पत्नीचं नाव आहे स्नेहा रेड्डी.

सेलिब्रिटी

अल्लू अर्जुनची पत्नी अभिनय क्षेत्रामध्ये नाहीये. परंतु ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

बिझनेस वूमन

स्नेहा एक बिझनेस वूमन आहे. तिने Picaboo सारख्या प्रोजेक्टमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

स्टुडिओ

हा स्टुडिओ प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी ओळखला जातो. मीडिया रिपोर्टनुसार स्नेहा रेड्डी ४२ कोटींची मालकीन आहे.

Love Story

अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांची पहिली भेट एका लग्नात झाली होती. स्नेहाला बघूनच अल्लूला तिच्यावर प्रेम जडलं.

लग्न

सुरुवातीला दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि २०१० मध्ये साखरपुडा केला. २०११ मध्ये दोघांनी लग्न केलं.

कुटुंब

अल्लू आणि स्नेहाला दोन मुलं आहेत. हे चौकोनी आणि सुखी कुटुंब कायम चर्चेत असतं.