Sandip Kapde
आळसंद गावाला औंध संस्थानकाळापासूनचा प्राचीन आणि समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
Village of Temples Maharashtra
esakal
सांगली जिल्ह्यातील आळसंद हे गाव आज ‘देवळांचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते.
Village of Temples Maharashtra
esakal
एका छोट्याशा गावात तब्बल १३० मंदिरे असणे हे आळसंदचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
Village of Temples Maharashtra
esakal
सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात श्रद्धेचा मोठा ठेवा पाहायला मिळतो.
Village of Temples Maharashtra
esakal
गावातील प्रत्येक मंदिरात ग्रामस्थांकडून नित्यनेमाने पूजा आणि धार्मिक विधी केले जातात.
Village of Temples Maharashtra
esakal
राजवल्ली पिर आणि दस्तगिर पिर यांची दर्गा हिंदू–मुस्लिम ऐक्याचे सुंदर प्रतीक मानली जाते.
Village of Temples Maharashtra
esakal
आळसंदमध्ये सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन देवांना नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.
Village of Temples Maharashtra
esakal
गावातील काही मंदिरे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट नमुने आहेत.
Village of Temples Maharashtra
esakal
काशी विश्वेश्वर महादेव मंदिर सुमारे ३५० वर्षांचा प्राचीन धार्मिक वारसा जपून उभे आहे.
Village of Temples Maharashtra
esakal
अफजलखान महाराष्ट्रात आला मंदिराची नासधूस केली होती, पण या गावात तो फिरकला नाही, अशी चर्चा असते
Village of Temples Maharashtra
esakal
विठ्ठल–रुक्मिणी, गणपती, दत्त, लक्ष्मी अशा विविध देवतांची मंदिरे गावात आढळतात.
Village of Temples Maharashtra
esakal
काही मंदिरे ही मागील काही दशकांत ग्रामस्थांनी स्वतःच्या श्रमातून उभारलेली आहेत.
Village of Temples Maharashtra
esakal
वर्षभरात गावातील देवतांच्या यात्रांसह तब्बल २४ धार्मिक कार्यक्रम साजरे होतात.
Village of Temples Maharashtra
esakal
विविध जाती आणि धर्मांचे लोक या गावात गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
Village of Temples Maharashtra
esakal
खानापूर तालुक्यात वसलेले आळसंद गाव सांगलीपासून सुमारे ६६ किलोमीटर अंतरावर आहे.
Village of Temples Maharashtra
esakal
आळसंद गाव आज श्रद्धा, इतिहास आणि मंदिरसमृद्ध परंपरेमुळे ‘देवळांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.
Village of Temples Maharashtra
esakal
chhatrapati Shivaji Maharaj
esakal