Aarti Badade
थोडंसं काम करूनही दम येतोय? थकवा तुमच्या जीवनशैलीशी निगडीत असू शकतो. ही कारणं लक्षात घ्या!
शरीराला पुरेशी विश्रांती न मिळाल्यास तो थकतो. रोज 7-8 तास झोप आवश्यक आहे.
कामाचा ताण, चिंता आणि नात्यांमधील तणाव यामुळे मानसिक थकवा वाढतो. ध्यान, योगा आणि विश्रांतीच्या सवयी उपयुक्त ठरतात.
फास्ट फूड, साखरयुक्त पदार्थ, किंवा पोषणशून्य आहार शरीराची उर्जा कमी करतो. संतुलित आणि नैसर्गिक अन्न निवडा.
नियमित हालचाल न केल्यास शरीर जड आणि आळशी वाटू लागतं. दररोज थोडा वेळ चालणं, स्ट्रेचिंग, योग करा.
थकवा एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं. थायरॉईड, ॲनिमिया, मधुमेह किंवा नैराश्य यांची शक्यता तपासा.
थकवा म्हणजे कायदाचं लक्षण नाही! तो आपल्या सवयींचं आणि आरोग्याचं आरसा असतो. तो नजरेआड करू नका – कारण शोधा.
थकवा 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, कामात अडथळा येत असेल – तर तज्ञांचा सल्ला घ्या.