सकाळ डिजिटल टीम
ही दुनिया अनेक आश्चर्यांनी भरलेली आहे. भारतातही काही असे विचित्र आणि कमी माहित असलेली तथ्ये आहेत, त्यापैकी एक म्हणजे 'अमार' हे गाव.
या गावाच्या नावाचा अर्थ आहे "आपलं गाव".
भूतान सीमेजवळ असलेलं हे गाव फक्त साडेतीन फूटांपेक्षा कमी उंचीच्या लोकांचं आहे.
या गावात फक्त ७० लोक राहतात. काही जण स्वतःहून येथे आले आहेत, तर काहींना कुटुंबीयांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे.
२०११ मध्ये 'नेशनल स्कूल ऑफ ड्रामा' मधून शिकलेला अभिनेता पवित्रा राभा यांनी हे गाव स्थापन केलं. पवित्रा यांनी अॅकॅडमीतून बाहेर पडल्यानंतर रंगभूमीला प्रोत्साहन देण्याचा विचार केला आणि लहान उंचीच्या लोकांना कलाकार बनवण्याचं ठरवलं.
रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ठेंगण्या उंचीच्या लोकांना कलाकार म्हणून घडवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं. अनेक लोकांनी राभा आणि या लोकांची चेष्टा केली, पण त्यांच्या जिद्दीनं एक नवा कलाकार निर्माण केला.
आज या गावातील लोक दिवसा शेती करतात आणि संध्याकाळी रंगमंचावर आपली कला सादर करून जगाचं मनोरंजन करतात.