मुस्लिम मेंढपाळाला लागला होता अमरनाथ शिवलिंगाचा शोध; नेमका इतिहास काय?

संतोष कानडे

जम्मू काश्मीर

जम्मू काश्मीरमधलं अमरनाथ हे हिंदूंचं मोठं तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी बर्फापासून नैसर्गिकरित्या शिवलिंग तयार होतं.

अमरनाथ

अमरनाथ हे ठिकाणी श्रीनगरपासून १३५ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासूनची उंची १३ हजार ६०० फूट इतकी आहे.

शिवलिंग

अमरनाथ शिवलिंगाच्या शोधाची एक आख्यायिका सांगितली जाते. १८५० मध्ये बुटा मलिक नावाच्या मेंढपाळाची ही गोष्ट आहे.

बुटा मलिक

बुटा मलिक हा मुस्लिम मेंढपाळ होता. तो मेंढ्या चारण्यासाठी माळरानावर गेला तेव्हा तिथे त्याला एक साधू भेटतात.

साधू

पावसाळ्याचे दिवस असल्याने भरपूर थंडी होती. बुटा पावसाने गारठून गेला होता. तिथे असलेले साधू त्याला कोळशाने भरलेली पिशवी देतात.

आग

बुटा मलिक घरी जातो, आग पेटवण्यासाठी कोळशाने भरलेली पिशवी उघडून पाहातो तर त्यात त्याला सोनं दिसतं.

गुहा

बुटा मलिक खूश होऊन पुन्हा साधूकडे जातो. परंतु त्याला तिथे साधू भेटत नाहीत. मात्र त्याला तिथे एक गुहा दिसते.

बर्फाचं शिवलिंग

गुहेमध्ये बर्फाचं शिवलिंग तयार झालेलं होतं. बुटा मलिकला काय करावं काहीच कळेना. तो गावकऱ्यांना हे सगळं सांगतो.

गुलाबसिंग

काश्मीरचे राजा गुलाबसिंग यांच्यापर्यंत ही माहिती पोहोच केली जाते. त्यानंतर अमरनाथ येथे दर्शनासाठी भाविकाच्या रांगा लागतात.

अमरनाथ यात्रा

या घटनेच्या तीन वर्षांनंतर अमरनाथ यात्रेला सुरुवात झाल्याची माहिती आहे. अपवाद वगळता ही यात्रा आजतागायत सुरुच आहे.

भगवान शंकर

भगवान शंकराने पार्वती मातेला अमरत्वाचा मंत्र इथेच सांगितला. त्यामुळे अमरनाथ नाव पडल्याची कथा सांगितली जाते.