सकाळ डिजिटल टीम
लवंग केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर अनेक आजारांवर औषध म्हणूनही काम करते. आयुर्वेदात याचा वापर वर्षानुवर्षे केला जात आहे.
पण, तुम्हाला माहिती आहे का की, सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया त्याचे फायदे..
सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे लवंगाचे पाणी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि इन्सुलिनचे उत्पादन जलद होते.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीराला डिटॉक्सिफाय करते, त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.
याशिवाय, दररोज सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि संसर्गामुळे पसरणारे आजार दूर होतात.
तसेच दातदुखी, हिरड्या सुजणे किंवा संवेदनशीलतेच्या समस्या असल्यास लवंगाचे पाणी पिणे फायदेशीर आहे. ते श्वासाला ताजेतवाने देखील करते.
यासाठी रात्री पाच ते सहा लवंगा एका ग्लास कोमट पाण्यात भिजवा आणि सकाळी 15 ते 20 मिनिटे उकळवा आणि थंड झाल्यावर हे पाणी प्या.