आंबेडकरांनी घटना लिहिली तेव्हा त्यांची दिनचर्या कशी होती ?

Anushka Tapshalkar

भारताचा शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी एकहाती घटनेचा मसुदा लिहून काढला. कशी होती त्यांची घटना लिहितानाची दिनचर्या

Dr. Babasaheb Ambedkar | sakal

दिवसाची सुरुवात

बाबासाहेब सकाळी 6 वाजता उठत. 7.30 पर्यंत प्रातर्विधी, स्नान, न्याहारी करून संविधान लेखनासाठी सज्ज होत.

Dr. Babasaheb Ambedkar | sakal

दिवसाची पहिली चर्चा

घटनाभवनात पोहोचल्यावर सर्वप्रथम सेक्रेटरीसोबत 15-20 मिनिटांची महत्त्वाची चर्चा होत असे.

Dr. Babasaheb Ambedkar | sakal

संविधान लेखनाची रणनिती

सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत संविधान समितीच्या कामात ते संपूर्णपणे गुंतलेले असत.

Dr. Babasaheb Ambedkar | sakal

कायदेमंत्री म्हणून भूमिका

संविधानाच्या कामानंतर दुपारी १२ ते १.३० ते कायदेमंत्री म्हणून त्यांच्या कार्यालयीन जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करत.

Dr. Babasaheb Ambedkar | sakal

दुपारचं विरामपर्व

जेवणानंतर दुपारी २ वाजता थोडी विश्रांती घेतली जात असे. परंतु वाचन त्यातही सुरूच राहायचं!

Dr. Babasaheb Ambedkar | sakal

संध्याकाळच्या बैठका

घटनासमितीतील पक्षीय चर्चेसाठी संध्याकाळी ४ नंतर वेळ दिला जात असे.

Dr. Babasaheb Ambedkar | sakal

मार्गदर्शन आणि स्पष्टता

घटनेचे बारकावे समजावून देण्यासाठी बाबासाहेब इतर सदस्यांना मार्गदर्शन करायचे.

Dr. Babasaheb Ambedkar | sakal

घरी परत – दिवसभराची झुंज

संपूर्ण दिवसभर काम करून ते संध्याकाळी घरी परतत व त्यानंतर रात्री ७-८ ला विश्रांती करायला जात. भारताच्या भवितव्याचा विचार करत काम करत राहायचे.

Dr. Babasaheb Ambedkar | sakal

बाबासाहेब आंबेडकरांच्या ३ प्रेरणादायी शिकवणी

आणखी वाचा..