विनयन वाघमारे
गोकुळ दूध संघ हा केवळ कोल्हापूर जिल्ह्याचाच नव्हे तर राज्याचा मोठा ब्रँड बनला आहे. या दूध संघाची स्वतःची आर्थिक उलाढाल जवळपास ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे
Gokul
Sakal
दुधाची वाहतूक करणारे टँकर्स, टेम्पो, दूध एजन्सी, तूप, श्रीखंड, बासुंदी यांसारखे उपपदार्थ, पशुखाद्य आणि प्रक्रिया उद्योग या संपूर्ण साखळीची एकत्रित उलाढाल १० हजार कोटींहून अधिक असून प्रचंड रोजगारनिर्मिती होते.
Gokul
Sakal
जिल्ह्यातील ५ ते साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी गोकुळशी थेट जोडलेले आहेत. त्यामुळे संचालकपदाच्या माध्यमातून गावागावातील शेतकऱ्यांशी थेट जनसंपर्क निर्माण होतो.
Gokul
Sakal
राजकीय विश्लेषकांच्या मते, एकदा गोकुळचा संचालक झाला की पुढील राजकीय कारकिर्दीसाठी मोठी ताकद मिळते. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात या संपर्काचा थेट प्रभाव पडतो.
Gokul
Sakal
कोल्हापूरमध्ये गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बाजार समित्या आणि साखर कारखाने यांवर ज्यांचे नियंत्रण असते, त्यांच्याच हातात विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेच्या राजकारणाची सूत्रे राहतात.
पूर्वी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून गोकुळचा कारभार चालवला जात असे. मात्र बदलत्या समीकरणांमुळे आता सतेज पाटील (महाविकास आघाडी) आणि हसन मुश्रीफ यांच्यासह महायुतीच्या रूपाने राजकीय पक्षांचा थेट शिरकाव झाला आहे.
शेतकऱ्यांशी असलेला थेट संबंध आणि हजारो कोटींची उलाढाल यामुळे गोकुळ ही कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक जीवनाची नाडी बनली आहे.
Dussehra
Sakal