Shubham Banubakode
महिलेने ऑनलाईन मागितलेल्या पार्सलमध्ये चक्क एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.
आंध्रप्रेदशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील येंदागांडी गावात ही घटना घडली.
ज्यात एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.
नागा तुलसी असं या महिलेचं नाव आहे.
या महिलेने घर बांधण्यासाठी क्षत्रिय सेवा समितीकडे मदत मागितली होती.
त्यानुसार, महिलेला घरासाठी लागणाऱ्या वीटा, सिमेंट तसेच टाईल्स पाठवल्या होत्या.
महिलेने या समितीकडे फॅन आणि इतर इलेट्रानिक्सच्या वस्तूंची मागणी केली होती.
या समितीने गुरुवारी या वस्तू पार्सल येतील, असं सांगितलं.
गुरुवारी एक व्यक्ती एका मोठ्या बॉक्समध्ये एक पार्सल घेऊन आला.
यात इलेट्रॉनिक्सच्या वस्तू असल्याचही त्याने महिलेला सांगितलं.
महिलेने हे पार्सल उघडून बघितलं तर त्यात चक्क पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
या पार्सलमध्ये एक पत्रदेखील आढळून आले आहे.
ज्यात महिलेकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मृत व्यक्तीचं वय ४५ वर्ष असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.