आता थांबायचं नाही गड्या... कुंबळेनं अश्विनसाठी सेट केलं टार्गेट

अनिरुद्ध संकपाळ

रविचंद्रन अश्विनने झॅक क्राऊलीची विकेट घेत कसोटी क्रिकेटमधील आपला 500 वा बळी टिपला.

Ravichandran Ashwin | esakal

अश्विन सर्वात कमी डावात 500 विकेट्स घेणारा मुरलीधरननंतरचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने या यादीत अनिल कुंबळेला देखील मागं टाकलं.

अश्विन हा भारताकडून 500 विकेट्स घेणारा अनिल कुंबळेनंतरचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

या भन्नाट कामगिरीनंतर समालोचन करणाऱ्या अनिल कुंबळेने अश्विनचे कौतुक केलं. कुंबळेने अश्विनचं कौतुक करतानाचा एक टार्गेट देखील दिलं.

जिओ सिनेमावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बोलताना कुंबळे म्हणाला की, अश्विनने 625 किंवा 630 कसोटी विकेट्स घ्याव्यात. त्याआधी त्यानं थांबू नये.

भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 619 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने हा विक्रम मोडावा अशी कुंबळेची इच्छा आहे.

ravichandran Ashwin Anil Kumble

सर्वात कमी डावात 500 विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अश्विनचा जलवा