Monika Shinde
होळीमध्ये सर्व एकमेकांना रंग लावतात, पण रंगांमध्ये असलेल्या केमिकल्समुळे त्वचा आणि केसांना त्रास होऊ शकतो.
यामुळे त्वचेमध्ये लालसरपणा, सूज आणि केस गळण्यासारख्या समस्याही होऊ शकतात.
होळी खेळण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावा. यामुळे त्वचेला रंगांचा त्रास होणार नाही आणि केस साफ करणे सोपे होईल.
रंगांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावा. यामुळे त्वचेला सूज आणि रंगांमुळे होणाऱ्या इतर नुकसानीपासून बचाव होईल.
केसांना रंग लागण्यापासून वाचवण्यासाठी शॉवर कॅप घाला. यामुळे रंग तुमच्या केसांमध्ये जाणार नाही.
त्वचेची काळजी घेण्यासाठी फुल स्लीव्हज कपडे घाला. यामुळे रंग त्वचेवर कमी लागेल.
होळी खेळताना नखांना देखील रंगामुळे त्रास होऊ शकतो. यासाठी, नखांवर तेल किंवा नेल पॉलिश लावून त्यांना संरक्षण करा.