शिवरायांच्या सैन्यात होता एक पारशी योद्धा, त्याच्याच वंशजाने जिंकून दिलं ६५चं युद्ध

Sandip Kapde

"शौर्याची पारशी परंपरा"

मुंबईत जन्मलेले अर्देशीर तारापोर हे पारशी घराण्यातले होते. त्यांचे पूर्वज रतनजीबा शिवाजी महाराजांच्या सैन्यात अधिकारी होते.

Ardeshir Tarapore | esakal

"लहानपणापासून रणगाड्यांचे वेड"

हैदराबादमध्ये वाढलेल्या तारापोर यांना लहानपणापासून रणगाड्यांचे आकर्षण होते. त्यांनी हैदराबाद इन्फन्ट्रीत प्रवेश घेतला आणि नंतर आर्मर्ड डिव्हिजनमध्ये आले.

Ardeshir Tarapore | esakal

"दुसऱ्या महायुद्धात शौर्य"

दुसऱ्या महायुद्धात मध्यपूर्वेत त्यांनी लढत मोठा पराक्रम गाजवला. स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्करात ‘पूना हॉर्स’मध्ये दाखल झाले.

Ardeshir Tarapore | esakal

"१९६५ युद्धात खास जबाबदारी"

पाकिस्तानविरुद्ध सियालकोट भागात फिल्लोरा काबीज करण्याची जबाबदारी पूना हॉर्सच्या तारापोर यांच्यावर होती.

Ardeshir Tarapore | esakal

"रणगाड्यांचे महासंग्राम: चविंडा"

पाकिस्तानने १३५ रणगाडे पाठवले. चविंडाजवळ भारतीय सेना अडकली, तरीही तारापोर यांनी ठामपणे लढायचा निर्णय घेतला.

Ardeshir Tarapore | esakal

"शौर्याचं ज्वलंत उदाहरण"

भयंकर हल्ला होत असतानाही त्यांनी जागा सोडली नाही. स्वतः जखमी होऊनही आपल्या सैनिकांना प्रेरणा दिली.

Ardeshir Tarapore | esakal

"६० पाकिस्तानी रणगाड्यांचा नाश"

भारतीय जवानांनी ६० रणगाडे जाळून टाकले. चविंडा हे युद्ध रणगाड्यांचं स्मशान ठरलं.

Ardeshir Tarapore | esakal

"शेवटचा श्वास रणभूमीत"

या युद्धात तारापोर वीरमरण पावले. पण त्यांनी लढलेलं युद्ध भारताच्या विजयासाठी निर्णायक ठरलं.

Ardeshir Tarapore | esakal

Ardeshir Tarapore"परमवीर चक्राचा मान"

लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आलं. त्यांचं शौर्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं.

Ardeshir Tarapore | esakal

अणुबॉम्ब टाकल्यानंतर काय परिणाम होतात?

Blast Impact of a Nuclear Bomb | esakal
येथे क्लिक करा