बुमराच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरचा स्टॉयनिसनं पिक्चर पाडला

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 च्या हंगामातील शेवटचा सामना लखनौ सुपरजायंट्स सोबत खेळला.

आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला हंगामात पहिल्यांदाच प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली.

अर्जुन तेंडुलकरने जसप्रीत बुमराहची जागा घेतली. त्यानं बुमराहप्रमाणेच पॉवर प्लेमध्ये प्रतिस्पर्धी संघाला धक्का देण्याचा प्रयत्न केला.

अर्जुन तेंडुलकरने त्याच्या पहिल्याच षटकात लखनौच्या मार्कस स्टॉयनिसला बाद केलं.

या विकेटनंतर अर्जुन तेंडुलकरने जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यानं शिखर धवन स्टाईलने विकेट सेलिब्रेट केली.

मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. स्टॉयनिसने एलबीडब्लूच्या निर्णयाविरूद्ध अपील केली.

तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला अन् स्टॉयनिसला नाबाद ठरवलं. अर्जुनचा विकेटचा आनंद हिरावून घेतला गेला.

सुनील छेत्रीचे खास विक्रम अन् पुरस्कार

येथे क्लिक करा