वयाच्या ३३ व्या वर्षी टीम इंडियासाठी पदार्पण करत या खेळाडूने रचला इतिहास

Pranali Kodre

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात १६ जूनपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली आहे.

India Women Cricket Team | X/BCCIWomen

भारताचा विजय

या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

India Women Cricket Team | X/BCCIWomen

आशा शोभनाचे पदार्पण

दरम्यान, या सामन्यातून भारतीय संघाकडून लेग स्पिनर आशा शोभनाने वनडे पदार्पण केले. तिने हे पदार्पण करताना एक अनोखा विक्रमही केला.

Asha Sobhana | X/BCCIWomen

३३ व्या वर्षी पदार्पण

तिने हे पदार्पण केले तेव्हा म्हणजे १६ जून २०२४ रोजी तिचे वय ३३ वर्षे ९२ दिवस इतके होते.

Asha Sobhana | X/BCCIWomen

विक्रम

त्यामुळे ती भारतीय महिला संघाकडून वनडेत पदार्पण करणारी सर्वात वयस्कर खेळाडू ठरली.

Asha Sobhana | X/BCCIWomen

१६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

यापूर्वी हा विक्रम सीमा पुजारेच्या नावावर होता, तिने २००८ मध्ये ३१ वर्षे २३८ दिवस वय असताना श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते.

Seema Pujare | Facebook

टी२० पदार्पण

इतकेच नाही तर आशा शोभना मे महिन्यात भारतीय महिला संघाकडून टी२० पदार्पण करणारीही सर्वात वयस्कर खेळाडू ठरली होती.

Asha Sobhana | X/BCCIWomen

वनडे पदार्पण गाजवले

दरम्यान, आशाने तिचे वनडे पदार्पण गाजवले आहे. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८.४ षटके गोलंदाजी करताना २१ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या.

Asha Sobhana | X/BCCIWomen

भारतीय खेळाडूंमधील 'बापमाणूस', पाहा गोड फोटो

Sports Stars Father's Day | Sakal
येथे क्लिक करा