Aarti Badade
गोडसर चव, पौष्टिक भोपळा आणि वऱ्याचे पीठ… ही आहे एकादशीसाठी परफेक्ट थालीपीठ रेसिपी!
१ वाटी वऱ्याच्या तांदळाचे पीठ, १ वाटी तांबड्या भोपळ्याच्या फोडी, १ वाटी गूळ आणि ¼ चमचा मीठ हे मुख्य साहित्य लागेल.
भोपळ्याच्या फोडी स्टीमरमध्ये किंवा कुकरमध्ये वाफवून घ्या. शिजल्यावर चाळणीत निथळत ठेवा.
गूळ छोटे तुकडे करून ठेवा जेणेकरून तो पीठात सहज मिसळेल आणि एकजीव होईल.
वाफवलेला भोपळा आणि गूळ एकत्र करा. त्यात वऱ्याचे पीठ घालून मिश्रण तयार करा. ते थोडंसं सैलसर असू द्या.
भाकरीपेक्षा थोडं सैलसर पीठ भिजवा, म्हणजे थापायला आणि शिजवायला सोपं जातं.
तव्याला तुपाचा हात लावून त्यावर थालीपीठ थापा. कडेने थोडं तूप सोडा म्हणजे ते खरपूस भाजेल.
थालीपीठाच्या दोन्ही बाजू खरपूस लालसर होईपर्यंत भाजा. यामुळे ते अधिक चविष्ट लागते.
तुमचं गोडसर, मऊसर आणि उपवासाला योग्य असलेलं थालीपीठ तयार आहे. दह्यासोबत किंवा नुसतंच त्याचा आस्वाद घ्या!
आरोग्याचे सुपरफूड बदाम लाडू खाण्याचे जबरदस्त फायदे !