संतोष कानडे
मराठी रसिकांच्या मनावर आजही गारुड कायम असलेला सिनेमा म्हणजे अशी ही बनवाबनवी
या सिनेमाने अनेक उच्चांक गाठलेले आहेत. सिनेमात सगळेच कलाकार दिग्गज होते, त्यामुळे अजरामर कलाकृती साकारली गेली.
सध्या एआय फोटोंचा ट्रेंड सुरु आहे. गुगलच्या जेमिनी या आर्टिफिशियल इंटेलिजिन्सच्या माध्यमातून ट्रेंड फॉलो केला जातोय.
यातच अशी ही बनवाबनव सिनेमातील अभिनेते सचिन पिळगावकर यांनी साकारलेल्या सुधाचे एआय फोटो व्हायरल झाले आहेत.
एआय फोटोंवर अभिनेते सचिन पिळगावकर यांनी कमेंटदेखील केली आहे. त्यांची मिश्कील कमेंट चाहत्यांना चांगलीच भावली.
'माझ्या आईची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद, ती तरुण असतानाचे फोटो' अशी मिश्कील टिप्पणी पिळगावकर यांनी केलीय.
अभिनेते सचिन पिळगावकर यांना सोशल मीडियावर कायम ट्रोल केलं जातं. त्याला कारण असतं त्यांची विधानं.
सचिन पिळगावकर हे अतिशयोक्त बोलतात, असा नेटकऱ्यांचा आक्षेप असतो. त्यामुळे त्यांना लक्ष्य केलं जातं.
तेही तेवढ्याच खिलाडू वृत्तीने ही टीका सहन करत असतात. या फोटोंवरुनही नेटकरी त्यांची मजा घेत आहेत.