Payal Naik
मराठी सिनेसृष्टीचे बादशाह असलेले अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने ८०- ९०चा काळ गाजवला.
अजूनही सिनेसृष्टीचे मामा असलेले अशोक सराफ मराठीसोबतच हिंदीमध्येही काम करताना दिसतायत.
सिनेमा, नाटक आणि मालिका अशा तीनही माध्यमांमध्ये ते आपली कमाल दाखवतायत.
आता मामांनी या पिढीशी जोडलेलं राहण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
अशोक सराफ यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर त्यांचं स्वत:चं ऑफिशियल अकाऊंट सुरू केलं आहे.
पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली आहे. अकाउंटवर पहिला फोटो शेअर करत आता आठवणींना उजाळा देऊया असं म्हटलंय.
त्यांनी अकाउंट उघडताच अनेक कलाकारांनी त्यांना फॉलो केलंय. ashoksaraf_official असं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नाव आहे.
सध्या ते 'अशोक मा.मा.' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
का झालेला तेजश्री प्रधानचा घटस्फोट? शशांकने केलेले गंभीर आरोप