Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला एका विकेटने पराभूत केले. या सामन्यात दिल्लीसाठी आशुतोष शर्मा हिरो ठरला.
तब्बल २१० धावांचा पाठलाग करताना दिल्लीने ६५ धावांवरच ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यावेळी ७ व्या क्रमांकावर इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून उतरलेल्या आशुतोष शर्मा आक्रमक अर्धशतक केले.
आशुतोषने ३१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६६ धावा करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान आशुतोषने सांगितले की चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीने मॅच फिनिश करण्याबाबत दिलेला सल्ला त्याच्या कामी आला.
स्टारस्पोर्ट्सशी बोलताना आशुतोष म्हणाला, 'धोनी भाईला गेल्यावर्षी त्याच्या फिनिशिंगबद्दल विचारले होते, तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्याच क्रमांकावर मी देखील करतो, त्यामुळे त्याला विचारले होते की परिस्थितीत कशी हाताळतो?'
तो पुढे म्हणाला, 'धोनीने सांगितले की अशा परिस्थितीत तणाव घ्यायला नाही, जेवढा दबावात जाणार, तेवढेच काम कठीण होईल. खूप जास्त विचार करू नको, चेंडू जसा येत आहे, तसा खेळायचा.'
पुढे आशुतोषने असंही सांगितलं की त्यानं धोनीला भेटल्यानंतर त्याच्यासोबत फोटोही काढला.