Monika Shinde
चहा प्रेमींनो, तुम्हाला माहित आहे का? भारतातील चहाची राजधानी एक अशी जागा आहे जिथे चहा केवळ पेय नाही, तर जीवनशैलीचा भाग आहे.
ही राजधानी म्हणजे आसाममधील दिब्रुगढ. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले हे शहर देशभरात चहासाठी प्रसिद्ध आहे.
दिब्रुगढमधील विस्तीर्ण चहाचे मळे आणि पारंपरिक तसेच आधुनिक चहा कारखाने या शहराची ओळख बनवतात.
येथे तयार होणारा चहा फक्त भारतातच नाही, तर जगभर निर्यात केला जातो, त्यामुळे दिब्रुगढला “चहा हब” म्हणून ओळखले जाते.
आसाम ब्लॅक टी हा येथील सर्वात लोकप्रिय चहा आहे. त्याचा गडद रंग, तीव्र सुगंध आणि दमदार चव जगभर प्रसिद्ध आहे.
लोक दुधाचा चहा, मसाला चहा, आले-वेलची चहा आणि हलका गोड चहा आवडीने पितात. काही ठिकाणी गूळ वापरून त्याची चव आणखी खास केली जाते.
चहा केवळ स्वादिष्ट नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायक आहे. योग्य प्रमाणात पिल्याने ऊर्जा, एकाग्रता आणि पचन सुधारते.
दिब्रुगढच्या चहा मळ्यांचा सुगंध आणि चहाची परंपरा जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच दिब्रुगढला भारतातील चहाची राजधानी म्हणतात.