Saisimran Ghashi
गुरुचा उदय ९ जुलै २०२५ रोजी मिथुन राशीत होणार असून, त्याच्या अठार हालचालीमुळे काही राशींना नकारात्मक परिणाम भोगावे लागतील.
या पाचही राशींनी निर्णय घेताना विशेष काळजी घ्यावी, कारण गुरुच्या वेगवान हालचालींमुळे अचानक बदल आणि अडथळ्यांची शक्यता अधिक आहे.
कन्या राशीमध्ये गुरु दहाव्या घरात असल्यामुळे व्यवसायात अडथळे आणि सामाजिक प्रतिष्ठेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांना आठव्या घरातील गुरुमुळे कामात अडथळे, प्रशासनाशी संघर्ष आणि आर्थिक चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो.
मकर राशीसाठी सहाव्या घरातील गुरु आरोग्य समस्यांपासून ते नोकरीत अडचणी आणि कौटुंबिक मतभेद निर्माण करू शकतो.
मीन राशीसाठी चौथ्या घरात गुरुचा उदय आरोग्य सुधारणा देईल, पण मानसिक तणाव, मालमत्तेचे प्रश्न आणि नोकरीतील अस्थिरता वाढवू शकतो.
मेष राशीसाठी तिसऱ्या घरातील गुरु प्रवास, भावंडांशी मतभेद आणि करिअरमध्ये नुकसान यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे