संतोष कानडे
औरंगजेबाने सत्तेच्या लालसेपोटी आपल्या सख्ख्या भावाचा – दारा शुकोहचा – अमानुष खून केला. ही त्याच्या सत्ताकारणाची सुरुवात होती.
दारा शुकोहच्या जीवनात एक सुंदर, निडर व आत्मसन्मानी स्त्री होती – ती म्हणजे बदासी रानदिल. तिचे सौंदर्य अपूर्व होते.
दारा शुकोहला मारल्यानंतर औरंगजेबाचे लक्ष बदासी रानदिलकडे वळले. तिचे गुलाबी गाल आणि लांबसडक केस यामुळे औरंगजेब मोहीत झाला होता.
बादशहा औरंगजेबाने तिला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला. त्याने सौंदर्याची लालसा बदासीला बोलूनही दाखवली असावी.
बदासी रानदिलने औरंगजेबाच्या मोहाला शरण न जाता स्वतःचे सौंदर्यच नष्ट करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
तिने आपले लांबसडक केस कापले आणि गुलाबी गालांवर धारदार चाकूने घाव घातले.
या सर्वांचे प्रतीक म्हणून, केस व रक्ताने भरलेली पत्रं तिने औरंगजेबाला पाठवली. त्यातून तिने एक संदेश दिला – “मी विकायची वस्तू नाही!”
हे दृश्य पाहून औरंगजेब स्तब्ध झाला. त्याने पुन्हा कधीही तिच्या वाट्याला जाण्याचे धाडस केले नाही.
बदासी रानदिल ही केवळ सौंदर्यवती नव्हे तर आत्मसन्मानासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असणारी निर्भय स्त्री होती.
ही घटना मनुची नामक लेखकाच्या आत्मचरित्रात नोंदवली आहे. इतिहासातील ही एक विस्मरणात गेलेली, पण प्रेरणादायक कहाणी आहे.