Sandip Kapde
औरंगजेबाने मराठ्यांकडून जिंकलेल्या किल्ल्यांची नावे बदलण्याची एक परंपरा सुरू केली होती.
राजगडचं नाव ‘शहानबीगड’ असं ठेवण्यात आलं होतं.
तोरणा किल्ल्याचं नाव बदलून ‘फुतुहुल्यैब’ असं करण्यात आलं.
विशाळगड या किल्ल्याला ‘सक्करलाना’ हे नाव देण्यात आलं.
रायगड जिंकल्यानंतर त्याचं नाव 'इस्लामगड' असं ठेवण्याचे आदेश औरंगजेबाने दिले.
'इस्लामगड' हे नाव अधिकृत करण्यासाठी शिलालेख कोरण्याचेही आदेश देण्यात आले.
हे नाव बदलणे म्हणजे केवळ भूगोल नव्हे, तर सांस्कृतिक अधिपत्य दर्शवण्याचा प्रयत्न होता.
मराठा साम्राज्याची ओळख पुसण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न होता.
मात्र इतिहास आजही या किल्ल्यांना त्यांच्या मूळ नावांनीच ओळखतो आणि त्या शौर्याची साक्ष देतो.
सिंहगड या ऐतिहासिक किल्ल्याचं नाव त्याने ‘बक्षिंदाबक्ष’ असं ठेवले.