Pranali Kodre
ऑस्ट्रेलियाची स्टार महिला अष्टपैलू खेळाडू ऍश्ले गार्डनर काही दिवसांपूर्वीच वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुजरात जायंट्सकडून खेळली.
तिने या स्पर्धेत गुजरात जायंट्सने नेतृत्व करताना संघाला पहिल्यांदाच प्लेऑफमध्येही पोचवले.
या स्पर्धेनंतर एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवड्यात ती लग्नबंधनात अडकली आहे.
तिने तिची दीर्घकाळची गर्लफ्रेंड मोनिका राईट हिच्याशी लग्न केले आहे.
त्यांचा जंगी विवाहसोहळा ऑस्ट्रेलियात पार पडला असून या सोहळ्यासाठी अनेक ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू उपस्थित होत्या.
ऍश्ले गार्डनर आणि मोनिका राईट यांनी एप्रिल २०२४ मध्येच साखरपूडा केला होता, त्यानंतर आता त्यांनी लग्न केले आहे.
दोघीही अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये होत्या, त्यांनी अनेकदा त्यांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केल आहे.