Anushka Tapshalkar
उष्ण हवामानात शरीराला थंडावा आणि ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त असलेले डाळिंब, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स ने समृद्ध आहे.
परंतु योग्यरित्या या फळाचे सेवन न केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पुढे दिलेलया गोष्टी टाळून आणि काळजीपूर्वक याचे सेवन करणे फादेशीर ठरेल.
रिकाम्या पोटी डाळिंब खाल्ल्यास त्यातील नैसर्गिक आम्लांमुळे पोटात जळजळ किंवा अस्वस्थता होऊ शकते.
जास्त प्रमाणात डाळिंब खाल्ल्यास त्यातील फायबरमुळे पचनाच्या समस्या जसे की गॅस किंवा जुलाब होऊ शकतात.
डाळिंबाचे सेवन काही औषधांवर परिणाम करू शकते, विशेषतः रक्त पातळ करणारी औषधे किंवा कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे घेत असाल तर सावधगिरी बाळगा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही लोकांना डाळिंब खाल्यानंतर ॲलर्जी होऊ शकते, जसे की अंगावर खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे. अशा प्रतिक्रिया आढळल्यास डाळिंब खाणे टाळा.
कच्चे किंवा खराब झालेले डाळिंब खाल्ल्यास पोट बिघडण्याची शक्यता असते. नेहमी ताजे आणि पिकलेले डाळिंब खाणे सुनिश्चित करा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.