इराणच्या क्रांतीचे प्रणेते अयातुल्ला खोमेनी भारतातल्या 'या' गावचे आहेत, 200 वर्षांपूर्वी...

Amit Ujagare (अमित उजागरे)

खोमेनींचे मूळ भारतात?

इराणच्या क्रांतीचे नेते अयातुल्ला खोमेनी यांचे आजोबा, सय्यद अहमद मुसवी हे भारतातील किन्तूर गावात १८०० च्या दशकात जन्मले होते.

खास ओळख

उत्तर प्रदेशातील लखनौपासून ७० किमी दूर किन्तूर गाव आहे. या शांत गावात फक्त ५ शिया कुटुंबे उरली आहेत. पण हे गाव एक ऐतिहासिक वारसा जपून आहे.

मुसवी यांचा प्रवास

१८३० मध्ये अहमद मुसवी यांनी ब्रिटिशांपासून दूर राहण्यासाठी भारत सोडला. ते आधी इराकमधील नजाफला गेले. १८३९ मध्ये ते इराणच्या खोमेयन शहरात स्थायिक झाले.

इराणशी संबंध कसा?

इराकमध्ये अहमद यांची ओळख युसुफ खान कमरचीशी झाली. त्यांनी त्याच्या बहिणीशी लग्न केले. यामुळे ते इराणच्या खोमेयनमध्ये स्थायिक झाले.

खोमेनींचे वडील

अहमद यांचे पुत्र सय्यद मुस्तफा हेच अयातुल्ला खोमेनींचे वडील होते. या कुटुंबाचा इराणचा वारसा इथे सुरू झाला.

अहमद हिंदी

भारताची आठवण म्हणून ते स्वतःला अहमद हिंदी म्हणवून घेत. त्यांचे १८६९ साली निधन झाले.

शिया विद्वत्तेचे केंद्र

किन्तूर गाव कधी काळी अवध राज्यातील शिया ज्ञानाचे मुख्य केंद्र होते. आज ते शांत असले तरी, त्याच्या गल्लीबोळात इतिहास दडलेला आहे.

मुसवी वंश

या मुसवी सय्यद कुटुंबाची सुरुवात इराणच्या निशापूरमध्ये झाली होती. १७०० च्या सुमारास ते भारतात आले आणि किन्तूरमध्ये स्थायिक झाले.

शौर्य, शिक्षणाचा वारसा

याच कुटुंबातील सय्यद करामत हुसेन अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. त्यांनी लखनौमध्ये मुस्लिम कन्या महाविद्यालयाची स्थापना केली.