'या' औषधी वनस्पतींच्या मदतीने चेहऱ्याची सैल त्वचा करा घट्ट, महागड्या क्रीम्सची गरज नाही भासणार

Monika Lonkar –Kumbhar

आपले वय जसजसे वाढते तसे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर दिसून येतो. साधारणपणे असे दिसून येते की, वाढत्या वयामध्ये त्वचेची लवचिकता ही कमी होऊ लागते. त्यामुळे, त्वचा सैल दिसू लागते. 

Ayurvedic Herbs

स्किनकेअर प्रॉडक्ट्स

अशा परिस्थितीमध्ये मग, अनेक महिला विविध प्रकारच्या स्किनकेअर प्रॉडक्टसचा वापर करताना दिसतात. मात्र, त्यामुळे, तात्पुरता फरक दिसून येतो. 

Ayurvedic Herbs

या स्किनकेअर प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्सचे प्रमाण जास्त असते. हे केमिकल्स त्वचेसाठी घातक ठरू शकतात.चेहऱ्याची त्वचा घट्ट करण्यासाठी तुम्ही काही औषधी वनस्पतींची मदत घेऊ शकता. त्यांचा वापर केल्याने तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होईल. कोणत्या आहेत या वनस्पती? चला तर मग जाणून घेऊयात.  

Ayurvedic Herbs

रोझमेरी

चेहऱ्यावरील त्वचा नैसर्गिकरित्या घट्ट करायची असेल तर, रोझमेरीचा वापर केला जाऊ शकतो. रोझमेरी ही आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. रोझमेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण आढळून येते, त्यामुळे, त्वचा घट्ट होण्यास मदत होते. 

Ayurvedic Herbs

जिनसेंग

जिनसेंग या औषधी वनस्पतीचा वापर खास करून त्वचेसाठी केला जातो. जिनसेंगमुळे त्वचेची लवचिकता सुधारण्यास मदत होते. यासोबतच जिनसेंगचा वापर करून आपण स्किन टोनर देखील बनवू शकतो आणि त्याचा स्किनकेअर रूटीनमध्ये समावेश करू शकतो. 

Ayurvedic Herbs

आवळा

आपल्या आरोग्यासाठी त्वचेसाठी आणि केसांसाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर पोषकघटकांचा समावेश असतो. ज्यामुळे, तुमची त्वचा नैसर्गिकरित्या घट्ट होते. 

Ayurvedic Herbs

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि तिची लवचिकता सुधारते.

Ayurvedic Herbs

मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात 'या' फळांचा करा समावेश, रक्तातील साखर झटकन विरघळेल

Diabetes Control Fruits