सकाळ डिजिटल टीम
१५ ऑगस्ट १९४७ जवळ येत होता आणि नव्या भारतासाठी अधिकृत राष्ट्रध्वजाची चर्चा सुरू होती.
भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती स्थापन झाली. अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद.
ध्वजाबाबत चर्चा करण्यासाठी स्वतंत्र समिती गठित. सदस्य – राजाजी, आझाद, सरोजनी नायडू, मुन्शी, आंबेडकर.
अनंतराव गद्रे, रावबहादूर बोले व गावंडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भगवा ध्वज स्वीकारावा अशी मागणी केली
बाबासाहेबांनी भगव्याचे दोन झेंडे स्वीकारले व दिल्लीतील बैठकीसाठी सोबत नेले.
दिल्लीमध्ये ध्वजावर चर्चा; बाबासाहेबांनी भगव्याची भूमिका जोरकस मांडली.
भगव्या ध्वजाच्या कल्पनेला घटना समितीत पुरेसा पाठिंबा मिळाला नाही
ऐतिहासिक संधी हुकली, भगवा झेंडा भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज बनू शकला नाही.
बाबासाहेबांचा हा प्रयत्न आजही प्रेरणा देतो. राष्ट्रध्वज मागील संघर्ष विसरून चालणार नाही!
संदर्भ- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, धनंजय कीर पृ. ४०८]