सकाळ ऑनलाईन
१९५६ मध्ये नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मदीक्षा घेतली. त्या काळातील अनेक अनमोल आठवणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत.
📘श्याम हॉटेलमध्ये मुक्काम
धम्मदीक्षेपूर्वी बाबासाहेब नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये थांबले होते. हे हॉटेल आजही त्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे.
📘आनंदनगरमधील स्वागत
हॉटेलसमोरच्या आनंदनगर वस्तीतील राधा कांबळे व अन्य महिलांनी बाबासाहेबांना प्रेमाने 'लंब्या रोट्या' खाऊ घातल्या होत्या.
📘'१८५७' नंबरची गाडी
बाबासाहेब नागपूरात ‘१८५७’ क्रमांकाच्या गाडीतून आले होते, अशी आठवण चरणदास चिकाटे यांनी दिली आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी लाखोंच्या उपस्थितीत बौद्ध धम्म स्वीकारला. ही घटना भारतीय इतिहासातील क्रांतिकारी वळण होती.
धम्मदीक्षेनंतर १८ ऑक्टोबर रोजी बाबासाहेब आंबेडकर नागपूरच्या सोनेगाव विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले.
विमानप्रवास नियमांनुसार, बाबासाहेबांची काठी विमानात नेता येत नव्हती. ती काठी एअरड्रोम ऑफिसमध्ये जमा केली जाणार होती.
प्रल्हाद मेंढे यांनी ही काठी बाबासाहेबांची आठवण म्हणून आपल्याकडे कायमची जपली. आजही ही काठी स्मृतिस्वरूप जपली जाते.
प्रत्येक वर्षी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला ही काठी जनतेला पाहाता यावी म्हणून उपलब्ध करुन दिली जाते.