Amit Ujagare (अमित उजागरे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जितके कर्तव्य कठोर होते तितकेच संगीतप्रेमी देखील होते. एक वाद्य शिकण्याची त्यांची मनापासून इच्छा होती.
आयुष्यभर हाल-अपेष्टा, अपमान, भेदभाव झेलल्यानंतर तसंच पुढील काळात सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिल्यानं त्यांना मनासारखं कधी काही करताच आलं नाही.
पण अखेर आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी व्हायोलिन शिकण्याचा निर्णय घेतला. आवर्जून वेळ काढून तब्बल दोन वर्षे ते हे वाद्य शिकले.
बळवंत साठे यांनी बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवायला शिकवलं. हे शकत असताना त्यांनी 'व्होयोलिन : हाऊ टू मास्टर इट' हे पुस्तकही भेट म्हणून दिलं.
वयाच्या साठीत बाबासाहेबांना मधुमेहाचा त्रास बळावला होता. त्यामुळं बराच वेळ व्हायोलिन शिकताना त्यांना शरीर साथ देत नसत.
थोडा वेळ व्हायोलिन वाजल्यानंतर ते बाजूला ठेवून देत, काही वेळाने पुन्हा वाजवायला सुरूवात करत. पण बाबासाहेब शरीराच्या सर्व विकारांवर मात करत, व्हायोलिन शिकलेच.
बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड जिद्दी व्यक्तिमत्व होते. लहानपणी त्यांना संस्कृत शिकण्याची इच्छा असतानाही सामाजिक बंधनांमुळं ते शिकता आलं नाही, पण मोठं झाल्यावर ते ही भाषाही शिकले.
तसंच सामाजिक बंधनं नसली तरी गरिबी आणि परिस्थितीची बंधन असल्यानं त्यांना व्हायोलिन शिकता आलं नसेल पण आपल्या शेवटच्या काळात ते हे ही शिकलेच.