Shubham Banubakode
२२ मार्चपासून आयपीएलच्या १८ व्या हंगामाला सुरुवात होते आहे.
त्यामुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी बघायला मिळणार आहेत.
मात्र, आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार कुणी मारले, तुम्हाला माहिती आहे का?
वेस्ट इंडिजचा फलंदाज क्रिस गेलने एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारले आहेत.
गेलने 2013 मध्ये पुण्याविरुद्धच्या सामन्यात 17 षटकार मारले.
याशिवाय 2012 मध्ये दिल्लीविरुद्ध 13 षटकार, 2015मध्ये पंजाबविरुद्ध 12 षटकार मारले.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात न्यूझीलंडच्या ब्रँडंन मॅक्युलमने केकेआरकडून खेळताना १३ षटकार मारले.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एबी डिव्हिलियर्सने २०१६ मध्ये एका सामन्यात १२ षटकार लगावले होते.
सनथ जयसूर्याने पहिल्या हंगामात चेन्नईविरुद्ध खेळताना ११ षटकार लगावले.
आंद्रे रसेलने २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ११ षटकार मारले.