उन्हाळ्यात पर्यटनासाठी साऊथमधील ही 'पाच' हिल स्टेशन बेस्ट!

Amit Ujagare (अमित उजागरे)

उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगररांगांमध्ये वसलेली अनेक हिलस्टेशन्स तर तुम्हाला माहितीच असतील. पण उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी साऊथ इंडियामध्येही अनेक उत्तम हिल स्टेशन्स आहेत.

उटी :

साऊथमधील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी सर्वात पहिलं नाव येत ते म्हणजे उटी. या ठिकाणी नवविवाहित जोडप्यांना आणि मित्रमंडळींना फिरण्यासाठी जाणं आवडतं. इथली टॉयट्रेन पर्यटकांचं खास आकर्षण आहे.

मुन्नार :

केरळमधील मुन्नार शहर हे नैसर्ग सौंदर्यानं नटलेलं आहे. या ठिकाणी सुंदर तलाव, झरे आणि दाट झाडी पाहून मन खूश होऊन जातं. तुम्हाला खूपच आनंद देणारं हे ठिकाण आहे.

कुन्नूर :

साऊथमधील कुन्नूर शहर देखील आपल्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखलं जातं. या ठिकाणी अनेक लॉज आणि हॉटेल्स आहेत जिथं तुम्ही आरामात राहू शकता. इथं तुम्हाला ट्रेकिंग आणि कॅंपिंगही करता येतं.

कोडाईकनाल :

कोडाईकनाल साऊथमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे. भारतातील १० सर्वात आनंददायी पर्यटनस्थळांमध्ये याचा समावेश आहे. इथला कोडाईल तलाव हा खूपच सुंदर आहे. या ठिकाणी तुम्ही नौकाविहार, घोडेस्वारी आणि सायकल चालवण्याचा आनंद घेऊ शकता.

कोटागिरी :

साऊथच्या सुंदर हिल स्टेशनपैकी कोटागिरी हे देखील आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक ट्रेकिंगचे पॉईंट पाहायला मिळतील. काही प्रसिद्ध ट्रेकिंग मार्गांमध्ये कोटागिरी-सेंट कॅथरीन फॉल्स मार्ग, कोटागिरी-कोडानाड मार्ग आणि कोटागिरी-लांगवुड मार्ग यांचा समावेश आहे.

कूर्ग :

कॉफीची शेती, धुक्याने झाकलेले डोंगर आणि भरपूर साहसी पर्याय.

यरकौड :

तुलनेत कमी गर्दी असलेले पण निसर्गाने भरलेले ठिकाण.