Saisimran Ghashi
कारले ही जरी चवीला कडू असली तरी तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे ती शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या कारल्याला आयुर्वेदात औषधी भाजी म्हणून महत्त्व आहे. चला, कारल्याची भाजी खाण्याचे पाच महत्त्वाचे फायदे जाणून घेऊया.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी कारल्याचा आहारात समावेश केला पाहिजे.
कारल्याच्या भाजीत डायटरी फायबर्स असतात. जे पचन सुधारून गॅस, अपचन यांसारख्या समस्या कमी करते.
कारल्याची भाजी खाल्ल्याने मुरूम, पिंप्लस, डाग आणि इतर त्वचा रोग दूर राहतात. कारण यामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असते.
कारले खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजार कमी करण्यास मदत मिळते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याची भाजी खाणे खूप फायद्याचे असते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.