Saisimran Ghashi
हल्ली लोकांमध्ये ब्लड प्रेशर त्यातही विशेष म्हणजे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण झाली आहे.
अशात आम्ही तुम्हाला एका फळाबद्दल सांगणार आहे ज्याने रक्तदाब नियंत्रणात राहील.
ड्राय फिग म्हणजेच अंजीर खाल्ल्याने ब्लड प्रेशरवर चांगला परिणाम होऊ शकतो, कारण अंजीर पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे.
रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी अंजीर हे एक उत्तम अन्न आहे, विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी.
अंजीर हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे, कारण ते रक्तदाब नियंत्रणात ठेवून कोलेस्ट्रॉलचे स्तर सुधरवते.
अंजीरचे उच्च फायबर कंटेंट पचनसंस्थेला मदत करते.
ड्राय फिग सहज उपलब्ध असतात आणि रात्री पाण्यात भिजवून त्याचा वापर शेक्स, स्मूदीज किंवा सॅलडमध्ये करता येतो.