शेवग्याची शेंगच नव्हे तर पावडर देखील आरोग्यासाठी फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

शेवगा

शेवग्याची शेंग आपण सर्वजण खातो. शेवगा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.

परंतु, तुम्हाला माहित आहे का? की, केवळ शेवग्याची शेंगच नाही तर शेवग्याची पाने आणि फुले सुद्धा आरोग्यासाठी तितकीच लाभदायी आहेत.

शेवग्याच्या पानांची पावडर

शेवग्याच्य पानांपासून जी पावडर बनवली जाते, ती पावडर देखील आरोग्यासाठी उपयुक्त आहे. या पावडरचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊयात.

भरपूर ऊर्जा

जेव्हा तुम्हाला शरीरात थकवा जाणवेल, तेव्हा मोरिंगा पावडरचे सेवन करा. या पावडरमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. यामध्ये मॅग्नेशिअम आणि लोह चांगले असते जे थकवा दूर करते.

वजन राहते नियंत्रणात

शेवग्याच्या पावडरमध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, या पावडरचे सेवन केल्यावर पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रित राहते.

पचनक्षमता सुधारते

शेवग्याच्या पावडरमध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते. यामुळे, शरीराची पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.

मधुमेह

शरीरातील ग्लुकोज आणि लिपिडची पातळी कमी करण्यासाठी तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी शेवग्याची पावडर फायदेशीर आहे.

ग्रीन टी प्या अन् निरोगी राहा..! जाणून घ्या फायदे

Benefits of Green Tea | esakal