रोहित कणसे
तुम्ही तुमच्या बजेटमध्ये कुठेतरी छानशा हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार करत असाल तर फार विचार करण्याची गरज नाही कारण आपल्या जवळपास अशी खूपशी ठिकाणे आहेत.
चला तर मग आपण महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध हिल स्टेशन्सबद्दल जाणून घेऊया, जिथे तुम्ही तुमच्या सुट्ट्या अगदी आनंदात घालवू शकाता.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हिल स्टेशन हे पर्यटनासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही धबधबे, टेकड्या, दऱ्या, घनदाट जंगले इत्यादींचा आनंद घेऊ शकता.
माथेरान हे महाराष्ट्रातील एक छोटेसे हिल स्टेशन आहे, जिथे तुम्ही वीकेंडलाही जाऊ शकता. शहराच्या गजबजाटापासून दूर राहून तुम्ही तिथल्या निसर्गाचाही आनंद घेऊ शकता.
लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. हे ठिकाण जोडप्यांसाठी खूप खास आहे. येथे तुम्ही अप्रतिम हवामान तसेच सुंदर हिरवळीचा आनंद घेऊ शकता.
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेले खंडाळा हिल स्टेशन हे सुंदर दऱ्या, टेकड्या, तलाव इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.
नाशिक जिल्ह्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेले इगतपुरी हिल स्टेशन अतिशय सुंदर आहे. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणी तुम्ही अनेक अॅक्टिव्हीटीजचा देखील आनंद घेऊ शकता.
महाराष्ट्रातील पाचगणी हिल स्टेशन हे अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे तुम्ही निसर्गाच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता आणि छान वेळ घालवू शकता.
या व्यतिरिक्त तुम्ही महाराष्ट्रातील चिखलदरा हिल स्टेशन, माळशेज घाट हिल स्टेशन, भंडारा हिल स्टेशन, जोहर हिल स्टेशन, कर्जत हिल स्टेशन, लवासा हिल स्टेशन इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता.
सनी लिओनीचा ‘कोटेशन गँग’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला