कमी वेळात अन् कमी साहित्यात बनवा रेस्टॉरंट स्टाईल कोळंबी चिली!

Aarti Badade

सी-फूड प्रेमींसाठी खास!

कोळंबीचे विविध प्रकार आपण खातोच, पण घरच्या घरी 'कोळंबी चिली' बनवण्याची ही चविष्ट रेसिपी तुमची संध्याकाळ खास बनवेल.

Kolambi Chilli

|

Sakal

साहित्य काय लागेल?

साफ केलेली कोळंबी, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, पाती कांदा, हिरवी मिरची, कॉर्नफ्लॉवर, एक अंडे, आलं-लसूण पेस्ट आणि विविध सॉसेस (सोया, चिली सॉस) तयार ठेवा.

Kolambi Chilli

|

Sakal

कोळंबीचे मॅरीनेशन

एका भांड्यात साफ केलेली कोळंबी घेऊन त्यात आलं-लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट, काळीमिरी पूड आणि सॉस घालून सर्व मसाले कोळंबीला व्यवस्थित लावून घ्या.

Kolambi Chilli

|

Sakal

कोटिंग आणि तळण

आता या मिश्रणात कॉर्नफ्लॉवर आणि एक अंडे फेटून घाला. कढईत तेल गरम करून ही कोळंबी एक-एक करून कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्या.

Kolambi Chilli

|

sakal

भाज्यांची फोडणी

दुसऱ्या कढईत थोडे तेल गरम करा. त्यात चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून मध्यम आचेवर परतून घ्या.

Kolambi Chilli

|

Sakal

सॉस आणि चव

भाज्या परतून झाल्यावर त्यात सोया सॉस, चिली सॉस, मीठ आणि काळीमिरी पूड घाला. सर्व मसाले एकजीव झाले की त्यात आधी तळून घेतलेली कोळंबी टाका.

Kolambi Chilli

|

Sakal

तयार आहे 'कोळंबी चिली'!

सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून वरून बारीक चिरलेला पाती कांदा पेरा. तुमची गरमागरम आणि चटपटीत 'कोळंबी चिली' खाण्यासाठी तयार आहे!

Kolambi Chilli

|

Sakal

रोज एक डाळिंब खा! शरीरात 'हे' बदल झालेले दिसतील

Pomegranate Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा