संतोष कानडे
२००३ पासून महंत नामदेव शास्त्री हे भगवानगडाचे महंत आहेत. त्यापूर्वी संत भिमसिंह महाराज हे गडाचे मठाधिपती होते
आठरापगड जातींची श्रद्धा असलेल्या या गडाला आता नवीन मठाधिपती मिळणार आहेत. त्यांचं नाव आहे महंत कृष्णा महाराज शास्त्री
कृष्णा महाराज शास्त्री हे पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत आहेत
कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड खुद्द विद्यमान मठाधिपती महंत नामदेव शास्त्री यांनी केली आहे
भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचं काम सुरु आहे. २०२६ मध्ये हे काम पूर्णत्वास जाणार आहे. याच वर्षीच गडाचा अमृतमहोत्सव आहे.
२०२६च्याच कार्यक्रमामध्ये कृष्णा महाराज शास्त्री यांच्याकडे भगवानगडाच्या गादीचं हस्तांतरण होणार आहे
कृष्णा महाराज शास्त्री हे भगवानगडाचे चौथे महंत असतील. निवड जाहीर झाल्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती
''अशाच माणसाची भगवानगडाला गरज आहे, ते गडाचा विकास करतील'' असं विधान महंत नामदेव शास्त्री यांनी केलं होतं
कृष्णा महाराज शास्त्री हे मूळचे तेलंगणा राज्यातले आहेत. भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात त्यांनी बारा वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीचं शिक्षण घेतलं
कृष्णा महाराज शास्त्री यांनी एम.ए. केलेलं आहे. तीन वर्षांपूर्वी ते एकनाथवाडी येथील निरंजन संस्थानचे महंत झाले होते