Apurva Kulkarni
भारती सिंगने आपल्या विनोदी स्वभावातून सर्वांचं मनोरंजन केलंय. तिचे लाखो चाहते आहेत.
परंतु इथंपर्यंत पोहचण्यासाठी तिला फार कष्ट करावे लागले. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
तिने सांगितलं की, आई- वडिलांना ती नकोशी झाली होती. त्यांना तिसरं मुल नको होतं.
त्यामुळे भारतीच्या आईने तिला गर्भातच मारण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु अनेक प्रयत्नानंतरही गर्भपात होऊ शकला नाही आणि भारतीचा जन्म झाला.
भारती म्हणाली की, 'आईला जेव्हा कळलं ती गर्भवती आहे, तेव्हा तीने अनेक वनस्पती, पपई तसंच इतर गरम पदार्थ खाल्ले.'
तसंच पुढे बोलताना भारती म्हणाली की, 'गर्भपात व्हावा म्हणून ती सतत जमिनीवर बसून जोर देऊन फरशी पुसायची. जेणेकरुन गर्भपात होईल. परंतु मी या जगात आलेच.'
भारती म्हणाली की, 'आईने मला घरीच एकटीने जन्म दिला. माझे वडील तेव्हा रात्रीच्या शिफ्टमध्ये गामावर गेले होते. मी फक्त 60 रुपयात जन्माला आलेली बाळ आहे.'
'पण मी आज माझ्या आईला 1 कोटी 60 लाखांचं घर घेऊ दिलं आहे. मला अभिमान आहे की, मी त्यांच्यासाठी खूप काही करु शकते.'