Pranali Kodre
महाराष्ट्रातील पुणे जिह्यातील भीमाशंकर हे एक पवित्र ठिकाण असून १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक हे ठिकाण आहे. हे ठिकाण भाविक आणि ट्रेकर्स दोघांसाठीही एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
भीमाशंकर ट्रेक हा निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. घनदाट जंगलातून आणि वन्यजीव अभयारण्यातून जाणारा हा ट्रेक आहे.
तरीही भीमाशंकर ट्रेक करण्याची काय वैशिष्ट्य आहेत, कोणते अनोखे अनुभव तुम्ही या ट्रेकमध्ये घेऊ शकता, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ
भीमाशंकर हा ट्रेक कोणत्याही हंगामात करता येतो, पण त्यातही पावसाळ्यातील कालावधी भीमाशंकर ट्रेकसाठी सर्वोत्तम समजला जातो.
भीमाशंकर ट्रेकसाठी दोन मार्ग आहेत. शिडी घाट मार्ग साहसी आहे, तर गणेश घाट नव्या ट्रेकर्ससाठी उपयोगी आहे. दोन्ही मार्गांनी साधारण ३.३० ते ४ तासांचा कालावधी या ट्रेकसाठी लागतो.
भीमाशंकर ट्रेक करताना वेगवेगळे पक्षी आणि प्राण्यांचं दर्शन या ट्रेकमधून होतं.
महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला शेकरू याचं प्रमुख वास्तव्य म्हणून भीमाशंकरचं जंगल ओळखलं जातं. त्या शेकरूचं दर्शन या ट्रेक दरम्यान होतं.
हा ट्रेक घनदाट जंगलातून जात असल्याने विशेषत: पावसाळ्यात हिरवाई, धबधबे, धुके मन मोहवते. बऱ्याचदा अशा वातावरणात पावसाची मजा आणखी घेता येते.
भीमाशंकरच्या ट्रेक दरम्यान बऱ्याचदा मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने आणि गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवता येते.
या ट्रेकदरम्यान लागतं ते गुप्त भीमाशंकर मंदिर. एका दगडाखाली पाण्याच्या प्रवाहास वसलेलं हे मंदिर असून इथं अध्यात्मिक शांतता अनुभवता येते.