सकाळ डिजिटल टीम
अर्जुन
अर्जुन हा एक मेन बॅटल टॅंक आहे. युद्धाच्यावेळी शत्रूच्या गोटात विध्वंस करण्याची क्षमता या रणगाड्यात आहे.
भीष्म
भीष्म हा एक रशियन बनावटीचा रणगाडा आहे. याचे मुळ नाव टी-९० (T-90) असे आहे. भारताकडे असणाऱ्या सर्वात आधुनिक रणगाड्यांपैकी एक आहे.
अजेय
हा देखील रणगाडा रशियन बनावटीचा असून त्याचे मुळ नाव टी-७२ असे आहे. भारतीय सैन्य दलात त्याला अजेय नावाने ओळखले जाते.
भारताकडे सध्या खुप मोठ्या प्रमाणात रणगाडे आहेत. हे रणगाडे पाकिस्तान विरुद्ध युद्धात महत्वाची भूमिका बजाऊ शकतात.
भारताकडे या घडीला साडेचार हजारांपेक्षा जास्त रणगाडे आहेत आणि ८७०० पेक्षा जास्त आर्मर्ड वेहिक्ल आहेत. जे युद्धाची दिशा बदलवण्याची ताकत ठेवतात.
बीएमपी-२
हा रणगाडा रशियन बनावटीचा असून भारतीय सेनेत मोठ्या संख्येने कार्यरत आहे. या रणगाड्याचे तंत्रज्ञान जुने असल्याने या रणगाड्यांचा वापर रुग्णवाहिकेच्या आणि लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.
विजयंता
विजयंता हा भारताचा स्वदेशी बनावटीचा पहिला रणगाडा होता. या रणगाड्याला सेवा निवृत्त करण्यात आलंय.