Yashwant Kshirsagar
जगातील सात आश्चर्यांपैंकी ताजमहल हे एक आहे. जगभरातील पर्यटक ताजमहलला भेट देतात. ताजमहल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते.
महाराष्ट्रातही सेम टू सेम आग्र्यासारखाच ताजमहल आहे. याला मिनी ताजमहल म्हणून देखील ओळखले जाते.
छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेली सुंदर वास्तू 'बीबी का मकबरा' या नावाने ओळखली जाते. ही वास्तू म्हणजे ताजमहलची प्रतिकृती आहे.
औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम हीचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. बानो बेगमला जिथं दफन करण्यात आलं तिथेच हा बीबी का मकबरा आहे. औरंगजेबाचा मुलगा आझमशाहने हा मकबर बांधला.
बीबी का मकबरा पाहताना आग्र्याचा ताजमहल आठवतो. कारण बीबी का मकबरा हा हुबेहुब ताजमहलसारखा दिसतो.
इसवी सन 1679 मध्ये बीबी का मकबरा बांधण्यात आला. ही ऐतिहासिक वास्तू 345 वर्ष जुनी आहे.
मकबऱ्याच्या उभारणीसाठी खास जयपूरमधून संगमरवरी दगड आणण्यात आले होते. आग्र्याच्या ताजमहल प्रमाणेच याची रचना आहे. यामुळेच अनेक पर्यटक याला आवर्जून भेट देतात