Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला राजस्थान उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
राजस्थान हायकोर्टाने शिल्पा शेट्टीविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे.
एका टिव्ही शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत जातीय सूचक भाषा वापरल्याबद्दल सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरुद्ध राजस्थानच्या चुरू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिल्पा शेट्टीविरोधात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिल्पा शेट्टीने 2013मधील एका मुलाखतीमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरला होता
या प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आधीच माफी मागितली आहे.
शिल्पा शेट्टी ही 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.