Udayanraje Bhosale : 'बावधनच्या बगाडाची परंपरा टिकली पाहिजे'; उदयनराजेंनी घेतलं बगाडाचं दर्शन

सकाळ डिजिटल टीम

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी बावधनच्या बगाड यात्रेस (Bavdhan Bagad Yatra) भेट देऊन दर्शन घेतले.

Bavdhan Bagad Tatra Wai

आपली परंपरा टिकण्यासाठी बावधनच्या बगाडाची परंपराही टिकली पहिजे, असं उदयनराजेंनी नमूद केलं.

Udayanraje Bhosale Bavdhan Bagad Tatra Wai

बावधन (ता. वाई) येथील बगाड यात्रा होती. या यात्रेतील बगाड्याच्या दर्शनासाठी खासदार उदयनराजे भोसले तेथे गेले होते.

Udayanraje Bhosale Bavdhan Bagad Tatra Wai

तुम्ही बगाडाकडे काय मागणं घातलं? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘आपण सर्वांनी बंधुभावानं राहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, तरच या देशाची परंपरा अबाधित राहणार आहे.

Udayanraje Bhosale Bavdhan Bagad Tatra Wai

बावधनच्या बगाडाची परंपरा टिकली पहिजे. प्रत्येकाचा शेवट होत असतो. श्वास कधी थांबेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात लोकांच्या हिताचे काम केले पाहिजे.

Udayanraje Bhosale Bavdhan Bagad Tatra Wai

भाजप तुमच्याशी फसवाफसवीचं राजकारण करत नाही ना? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, हा बगाडाचा विषय आहे. यामध्ये राजकारण आणू नका, असं त्यांनी स्पष्ट केलं. (फोटो : प्रमोद इंगळे)

Udayanraje Bhosale Bavdhan Bagad Tatra Wai

आरंभ है प्रचंड! दिल्‍लीतील वाटाघाटीनंतर साताऱ्यात उदयनराजेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन