सकाळ डिजिटल टीम
बऱ्याचदा लोक लघवीतून रक्तस्त्राव होत असल्याची तक्रार करतात. मूत्रात रक्त अनेक कारणांमुळे येऊ शकते.
याकडे दुर्लक्ष होता कामा नये. लघवीत रक्त येण्याची कारणे काय आहेत, हे आपण समजून घेऊ..
जर मूत्रमार्गातून बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करत असेल, तर मूत्र संसर्ग होतो. यामुळे मूत्रात रक्त येऊ शकते.
मूत्रात रक्त येण्याचे आणखी एक कारण म्हणजे, मूत्रपिंडाचा संसर्ग देखील असू शकतो. मूत्रात थोडासा लाल रंग दिसणे हे मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे असू शकते.
मूत्रपिंडातील खडा किंवा मूत्रपिंडाला झालेल्या कोणत्याही प्रकारच्या दुखापतीमुळे देखील मूत्रात रक्त येऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
पुरूषांमध्ये प्रोस्टेट नावाची एक लहान ग्रंथी आढळते. जर त्याचा आकार वाढला, तर पुरुषांना लघवीतून रक्तस्त्राव होण्याची समस्या येऊ शकते.
अनेक प्रकारच्या औषधांमुळेही मूत्रात रक्त येऊ शकते. लघवी पातळ करणाऱ्या औषधांमुळे लघवीमध्ये रक्त येते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.