मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळे फायदेशीर ठरू शकतात?

Aishwarya Musale

मधुमेह ही समस्या जगभरात चिंतेचा विषय ठरत आहे. दिवसेंदिवस याचे रुग्ण वाढत आहेत. बदलती जीवनशैली आणि चुकीच्या पद्धतीने खाणे, पिणे अशा अनेक कारणांमुळे लोक मधुमेहाचे बळी ठरत आहेत. 

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी माणसाला आयुष्यभर फक्त औषधेच घ्यावी लागतात असे नाही तर त्यासाठी लोकांना त्यांच्या आवडत्या गोड पदार्थांपासून दूर राहावे लागते. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी.

मधुमेहाच्या आजारात गोड पदार्थ आणि जास्त गोड फळे इत्यादी टाळण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊया मधुमेहाचे रुग्ण कोणती फळे खाऊ शकतात.

मधुमेही रुग्ण किवी, सफरचंद, नाशपती, पीच, बेरी, ब्लू बेरी, संत्री, पपई इत्यादी ठराविक प्रमाणात सेवन करू शकतात.

या फळांमध्ये भरपूर फायबर आणि 'व्हिटॅमिन सी'सह अनेक पोषक घटक असतात.

फळांचे सेवन प्रत्येकासाठी आवश्यक आहे. वजन कमी करण्यापासून ते शरीरातील आवश्यक पोषक घटकांपर्यंत ही फळं फायदेशीर आहेत.

ही फळे खाण्याबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांनी आपली औषधेही नियमितपणे घेतली पाहिजेत.

स्वतःच्या मनाप्रमाणे किंवा कोणी तरी सांगत आहे म्हणून आपली औषधे बंद करू नयेत. 

'हे' पदार्थ खात असाल तर सावधान, कर्करोगाचा धोका वाढतो!