Vrushal Karmarkar
संगममध्ये स्नान करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी येत आहेत. अक्षय कुमारने संगमात स्नान केले आणि आता कतरिना कैफ तिच्या सासूसोबत महाकुंभात पोहोचली आहे.
कतरिनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कतरिना कैफ तिच्या सासूसोबत महाकुंभात पोहोचली आहे.
यावेळी कतरिना कैफ पारंपारिक अवतारात दिसली. तिचा साधा लूक चाहत्यांना खूप आवडत आहे. तिने पीच रंगाचा सूट घातला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
महाकुंभ दरम्यान परमार्थ निकेतन शिबिरात कतरिना कैफने स्वामी चिदानंद सरस्वती आणि साध्वी भगवती सरस्वती यांचे आशीर्वाद घेतले.
कतरिना आणि तिच्या सासूबाईंच्या कपाळावर टिळक लावल्यानंतर त्यांचे फुले आणि हार घालून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर तिने मठात एक व्याख्यानही ऐकले. तिचे फोटो समोर आले आहेत आणि व्हायरल होत आहेत.
कतरिना कैफ अनेकदा तिच्या सासूसोबत धार्मिक स्थळांना भेट देते. काही काळापूर्वी, सासू आणि सून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या.
जिथून दोघींचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. विकी कौशल त्याच्या 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान महाकुंभाला गेला होता.