पतीच्या निधनानंतर ती एकटी पडली, मूलबाळ नसल्याचं दु:ख झालं; पण 'या' अभिनेत्रीनं स्वत:ला सावरलं!

सकाळ डिजिटल टीम

Actress Sadhana Sharma : बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक अशी अभिनेत्री आहे, जी केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही तर तिच्या अभिनयासाठीही प्रसिद्ध होती.

Actress Sadhana Sharma

60 आणि 70 च्या दशकातील या नायिकेनं लोकांमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण केली होती. अभिनेत्री साधना शर्मानं तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

Actress Sadhana Sharma

अभिनेत्री साधनानं 1960 मध्ये आलेल्या 'लव्ह इन शिमला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, ती व्यावसायिक जीवनात जितकी आनंदी होती, तितकाच तिला वैयक्तिक आयुष्यातही दुःखाचा सामना करावा लागला.

Actress Sadhana Sharma

साधना नावाची हेअरस्टाईल 'साधना कट' लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाली होती. एकेकाळी अनेकजण या लूकमध्ये केस कापायचे. ही अभिनेत्री बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Actress Sadhana Sharma

1966 मध्ये आलेल्या 'मेरा साया' चित्रपटातील 'झुमका गिरा रे' या गाण्यामुळं अभिनेत्री साधनाला चांगलीच प्रसिद्ध मिळाली होती. तिनं चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली होती.

Actress Sadhana Sharma

अभिनेत्रीनं तिच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. के. नय्यर यांच्याशी विवाह केला होता. लव्ह इन शिमला या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघंही खूप जवळ आले होते.

Actress Sadhana Sharma

एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीनं सांगितलं होतं की, माझं लग्न होऊन 30 वर्षे झाली होती. संसारही खूप सुखात सुरु होता. परंतु, माझे पती आर. के. नय्यर यांचं निधन झालं. त्यानंतर माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या निधनानंतर मी एकटी पडले आणि मला मूलही झालं नाही. सुरुवातीला मला मूलबाळ नसल्याचं खूप दु:ख होतं आणि मला भीती वाटत होती की मला काही झालं तर माझ्या जवळ कोणीही नसेल.'

Actress Sadhana Sharma

सौंदर्य वाढवण्यासाठी केली 'ही' सर्जरी अन् वयाच्या 31 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीला गमवावा लागला जीव