Aarti Badade
आजकाल धावपळीच्या आयुष्यात हाडांची मजबुती राखणे महत्त्वाचे आहे. काजू हाडांला बळकटी देण्यास उपयुक्त आहे.
काजूमध्ये प्रोटीन, फायबर, कार्ब्स, पोटॅशियम, कॅल्शियम, विटामिन बी६ आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांना शक्ती मिळते.
काजू कोणत्या प्रकारे खाल्ले तरी हाडांना फायदे होतात. येथे काही उपाय दिले आहेत.
रात्रभर ६-७ काजू पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उपाशीपोटी ते खा. काही दिवसात फरक दिसेल.
दुधामध्ये भिजलेले काजू हाडांना मजबूती देतात. दूध कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे.
काजू तुम्ही स्मूदीमध्ये मिक्स करून पिऊ शकता. यामुळे हाडांना अतिरिक्त बळ मिळते.
काजू हाडांसाठी असलेल्या फायदेशीर गुणधर्मामुळे तुम्ही अधिक तंदुरुस्त आणि सशक्त होऊ शकता.