Aarti Badade
आजकाल तरुण आणि लहान वयातील लोकांमध्येही हृदयरोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.
Diet for a Healthy Heart & Heart Disease Prevention
Sakal
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित तपासणी आवश्यक आहे. असे काही पदार्थ आहेत, जे हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
Diet for a Healthy Heart & Heart Disease Prevention
Sakal
फळांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयरोगाचा धोका कमी करतात. तसेच, ओट्स आणि ब्राऊन राईसमध्ये असलेले फायबर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदय निरोगी ठेवतात.
Diet for a Healthy Heart & Heart Disease Prevention
Sakal
बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांसारख्या सुक्या मेव्यामध्ये निरोगी चरबी, फायबर आणि प्रथिने असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत.
Diet for a Healthy Heart & Heart Disease Prevention
Sakal
पालक, मेथी, आणि ब्रोकोली यांसारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के असते. हे व्हिटॅमिन रक्तवाहिन्या निरोगी ठेवते आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखते.
Diet for a Healthy Heart & Heart Disease Prevention
Sakal
ओमेगा-३ फॅटी ॲसिड शरीरातील जळजळ कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात. यासाठी तुम्ही सॅल्मन मासा, अक्रोड आणि जवस खाऊ शकता.
Diet for a Healthy Heart & Heart Disease Prevention
Sakal
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला यामुळे तुम्ही हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकता. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
Diet for a Healthy Heart & Heart Disease Prevention
Sakal
Best fruits for a Healthy Liver & Detox
Sakal